Sun. Jun 20th, 2021

मोदींच्या या निर्णयाचा काश्मीरमध्ये वाईट परिणाम होईल – मेहबूबा मुफ्ती

“आजचा दिवस हा भारतीय लोकशाहीतील काळा दिवस आहे. ३७० कलम हटवण्याचा निर्णय हा अवैध आणि असंवैधानिक आहे. असं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे.

राज्यसभेत केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर राज्याला स्वतंत्र दर्जा देणारे 370 आणि 35अ ही दोन्ही कलम हटवण्यात यावा हा प्रस्ताव मांडला आहे. यावेळी विरोधी पक्षाने राज्यसभेत मोठा गोंधळ घातला. या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर मतदान होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून वेगाने घडामोडी घडताना दिसत आहेत.

अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विट करत यावर रोष व्यक्त केला आहे.

मेहबूबा मुफ्ती यांच ट्विट

काश्मीरमध्ये कलम 370 आणि 35A हटवण्याच्या निर्णयावर सगळ्यांनी टविट् करत  प्रतिक्रीया नोंदत आहेत. यामध्ये पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी यावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

“आजचा दिवस हा भारतीय लोकशाहीतील काळा दिवस आहे. ३७० कलम हटवण्याचा निर्णय हा अवैध आणि असंवैधानिक आहे. असं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. दहशतीत काश्मीर मिळवण्याचा प्रयत्न असल्याची त्यांनी म्हटलं आहे.

मोदींच्या या निर्णयाचा वाईट परिणाम होईल असं मत मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केलं आहे. काश्मीरला दिलेल आश्वासन पुर्ण करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. असं ही त्या म्हणाल्या आहेतं.

रविवारी रात्री काश्मीरमध्ये कलम 144 लागू करण्यात करण्यात आलं होतं. अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.

“भाजपा नेता असूनही वाजपेयींना नेहमीच काश्मिरींबद्दल सहानुभूती होती. त्यांनी काश्मीरमधील नागरिकांचं प्रेम आणि विश्वास मिळवला होता. असं टविट् करत त्यांनी वाजपेयींची आठवण काढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *