Fri. Jun 18th, 2021

…तर काश्मिरींच्या हाती तिरंग्याऐवजी दुसरा झेंडा- मेहबुबा मुफ्ती

‘आगीशी खेळू नका. कलम 35-अ शी छेडछाड करू नका. अन्यथा 1947 पासून आत्तापर्यंत जे तुम्ही पाहिलं नाही ते पहाल.’ अशी धमकीच जम्मू-काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिली आहे. 35-अ कलमाला हात घातल्यास जम्मू-काश्मीरचे लोक तिरंग्याऐवजी कोणता झेंडा हाती घेतील ते मला माहीत नाही,’ असा इशाराही मुफ्ती यांनी दिला आहे.

काश्मीरमधील नागरिकांना जमीन आणि स्थायी निवासासंदर्भातील विशेष हक्क कलम 35-अ द्वारे प्रदान करण्यात आले आहेत.

जम्मू-काश्मीरचेच माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेता उमर अब्दुल्ला यांनीही केंद्र सरकारला या संदर्भात सूचना दिली. केंद्र सरकारने निवडणूक घ्यावी. लोकांना निर्णय घेऊ द्यावा, असं वक्तव्य अब्दुल्ला यांनी केलंय.

नवं सरकार स्वत: कलम ३५-अ सुरक्षित ठेवण्याच्या दिशेनं काम करेल, असा विश्वासही अब्दुल्ला यांनी व्यक्त केला होता.

26-28 फेब्रुवारीदरम्यान जम्मू-काश्मीरमधील कलम ३५-अ च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

कलम 370 रद्द करण्याचं आश्वासन भाजपने 2014 च्या निवडणुकीत दिलं होतं.

त्यामुळे निवडणुकांआधी कलम 35-अ वर मोदी सरकार कठोर भूमिका घेण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *