Wed. Oct 27th, 2021

चोक्सींचा अजून एक ‘घोटाळा’ आला समोर

पंजाब नॅशनल बँकेला 11000 कोटींचा गंडा घालून फरार झालेल्या मेहुल चोक्सींचा नाशिकमधील अजून एक मोठा ‘जमीन घोटाळा’ समोर आला आहे. त्यांनी इगतपुरीतील रद्द झालेल्या SEZ मधील आपली जमीन गहाण ठेवून त्याबदल्यात मोठ्या बँकांकडून हजारो कोटींचं लोन घेतल्याचं समोर आलं आहे.

विशेष म्हणजे सर्वसामान्यांना किरकोळ लोनसाठी रडवणाऱ्या बड्या बँकांनी चोक्सीला खिरापतीप्रमाणे लोन दिल्याचे समोर येतंय. सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी यांनी माहितीच्या अधिकाराखाली मागावलेल्या माहितीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

काय आहे प्रकरण ?

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावच्या बळवंतनगर भागात चोक्सींची जमीन होती.

त्यांनी 250 एकर जमीन एकाच वेळी दोन बँकांमध्ये गहाण ठेवली.

नाशिक मल्टिसर्व्हिसेस SEZ लिमिटेड या कंपनीच्या नावे सुमारे 3 ,810 कोटींचं कर्ज घेतलं.

बँकांकडून देखील कोट्यवधींची खिरापत चोक्सीला वाटली गेली.

या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी प्रकरण उघडकीस आणणारे सामजिक कार्यकर्ते देवांग जानी यांनी केली आहे.

इगतपुरीच्या रद्द झालेल्या SEZ मध्ये चोक्सींची नाशिक मल्टी सर्व्हिसेस सेझ नावाच्या कपंनीला जवळपास 100 हेक्टर जमीन कोणत्या आधारे देण्यात आली, असा सवालही उपस्थित होत आहे.

2007 साली ही परवानगी दिल्याचे समोर येत असल्याने तत्कालीन सरकारी अधिकाऱ्यांची देखील या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी होत आहे.

हजारो हेक्टर जमीन गहाण ठेवत 24 बड्या सरकारी बँकांमधून लोन घेतले.

मात्र या बँकांनी देखील कोणतीही साईट व्हिजिट अथवा ऑडिट रिपोर्ट न करता लोन दिल्याचा आरोप होत आहे.

सर्वसामान्य नागरिकांचे पैसे मोठ्या लोकांना नियमबाह्य वाटणाऱ्या बँक अधिकाऱ्यांची देखील चौकशी करण्याची मागणी ठेवीदार संघटना आणि इतर अभ्यासक करत आहेत.

एकीकडे देशातून फरार झालेल्या निरव मोदीने देशाचं नागरिकत्व सोडलेलं असताना मेहुल चोक्सीच्या घोटाळ्यांचे रोज नवनवीन अध्याय समोर येत आहेत.

नाशिकसह महाराष्ट्रातील इतरही काही शहरांमध्ये अशाच प्रकारे घोटाळा करण्यात आल्याचे देखील अंदाज आहे.

मात्र ज्या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून मेहुल चोक्सीने हे उद्योग केले. त्या कंपन्यांच्या संचालकांना ईडी कधी ताब्यात घेणार याबाबतही सवाल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *