Sat. Feb 27th, 2021

गोळीबार टाळण्यासाठी तरुणाला जीपसमोर बांधून नेणाऱ्या मेजरचा सन्मान

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

जम्मू-काश्मीरमध्ये पार पडलेल्या पोटनिवडणुकीदरम्यान होणाऱ्या दगडफेकीपासून बचावाकरता स्थानिक काश्मिरी तरुणाला जीपसमोर बांधून नेणाऱ्या मेजर नितीन गोगोई

यांना भारतीय सैन्याने सन्मान केला आहे.  

 

लष्करप्रमुख जनरल बिपिन रावतांनी मेजर नितीन गोगोई यांना प्रशंसनीय सेवेचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

 

बडगाम जिल्ह्यात दगडफेकीपासून बचावासाठी जवानांनी लष्करी जीपच्या पुढील भागावर एका युवकाला बांधून नेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

 

यावरुन टीका सुरु होताच मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी राज्य पोलिसांकडून सविस्तर अहवाल मागवला. लष्करानेही या प्रकरणाची अंतर्गत चौकशीत मेजर गोगोई यांना

क्लिन चीट दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *