Tue. Sep 28th, 2021

पत्नी पीडित पुरुषांनी केलं मुंडन आणि पिंडदान!

पत्नी पीडित पुरुषांनी चक्क मुंडन आणि पिंडदान आंदोलन केलं. ‘सर्व कायदे महिलांसाठीच आहेत. त्यामुळे पुरुष वंचित झाले आहेत.’ असं आरोप करत हे आंदोलन करण्यात आलंय.

नाशिकच्या रामकुंडावर रविवारी 22 सप्टेंबर रोजी राज्यातील अनेक पुरुष एकत्रित जमले होते, ते चक्क मुंडन आणि पिंडदान करण्यासाठी. यातील काही जण वयस्कर आहेत तर काही जण अगदी चाळिशीतल्या आतले होते. मात्र ही सारी मंडळी कोणाच्या स्वागतासाठी नाही तर चक्क आपल्याच पत्नीच्या निषेधार्थ उभे होते. ही सर्व मंडळी पत्नीपीडित आणि महिला संरक्षण कायदा पीडित होती. या पुरुषांनी आपल्या पत्नीच्या नात्यांच पिंडदान केलं. पत्नीपासून होणाऱ्या सर्व त्रासाची आहुती देऊन मुंडन केलं. तसंच आमच्यावर होणारा अन्याय रोखण्यासाठी केंद्रीय पुरुष आयोगाची निर्मिती व्हावी अशी मागणी या संघटनांकडून होतेय.

देशात प्रचलित असलेल्या सर्व कायद्यांचं फक्त महिलांना संरक्षण असल्याचा आरोप या पुरुषांनी केलाय.

पुरुषांसाठी एकही कायदा नसल्याचंही या पुरुषांचं म्हणणं आहे.

यातील अनेकांवर त्यांच्या पत्नीनं खोट्या केसेस केल्या असल्याचा दावा केलाय.

कायद्याचा धाक दाखवून महिला,पुरुषांवर प्रचंड अत्याचार करताय असा आरोप हे पुरुष करताय

मात्र या पुरुषांनी केलेल्या पिंडदानाला काहीही महत्व नाही.

धार्मिक परंपरेत जिवंत माणसाचं पिंडदान करता येत नाही हे संतापाच्या भरात केलेलं पिंडदान आहे असं येथील पुरोहित सांगतात..

त्यामुळे आता या पुरुषांनी केलेल्या पिंडदानामुळे खरच पत्नीपासून त्यांना मुक्ती मिळेल का, की पुन्हा एकदा कायदेशीर बाबी समोर ठेवूनच आपल्या पत्नीला घटस्फोट द्यावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *