Jaimaharashtra news

विद्यार्थ्यांना योगी हेअरकट मारण्याचा शाळेचा अजब आदेश

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

मेरठमधील एका शाळेने विद्यार्थ्यांना योगी हेअरकट मारण्याचा अजब आदेश दिला. 

 

शाळेने पहिलीपासून ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आदेशांची यादीच तयार केली.

 

शाळेत एकूण 2800 विद्यार्थी शिकत असून सर्वांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे बारीक केस ठेवण्याचा आदेश देण्यात आला.

 

इतकंच नाही तर विद्यार्थ्यांना दाढी ठेवू नये अशी सक्त ताकीद देण्यात आली.

 

 

आपली शाळा असून मदरसा नाही असं म्हणत शाळेने दाढीला मज्जाव केला आहे.

 

यासोबतच मांसाहारावर बंदी घालण्यात आली असून लव्ह जिहादला प्रोत्साहन मिळू नये यासाठी मुलं आणि मुलींना वेगळं शिकवलं जात आहे.

 

ऋषभ अकादमी सह-शिक्षण इंग्रजी माध्यम शाळेतील हा प्रकार आहे.

Exit mobile version