‘सदस्य वाचवण्यासाठी विलीनीकरण हाच पर्याय’

Edited by – Rajshree Dahiphale
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे सध्या महाविकास आघाडीवर राजकीय संकट उभे ठाकले आहे.शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी बंडखोर आमदारांवर पत्रकार परिषद घेतली.त्यात शिवसेनेचे वकील देवदत्त कामतही सामील होते. त्यांनीही माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेने १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव दिला होता. आम्ही कायदेशीर मदतही घेऊ असे कामत म्हणाले.
खासदार अरविंद सावंत काय म्हणाले ?
बंडखोर आमदारांनी “दबाव आणि भीती” मुळे गुवाहाटी प्रवास केला होता. भाजपने शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना “पकडले” असा आरोप केला आणि त्यांना परत येऊ दिले नाही. त्यावर येत्या ४ दिवसांत कारवाई होईल. मुख्यमंत्र्यांनी त्या आमदारांसाठी स्वत:चे दरवाजे बंद केले आहेत. आम्ही सवौच्च न्यायालयातील वकिलांशी चर्चा केली आहे.’उपाध्यक्षांना कारवाईचे पूर्ण अधिकार आहेत. कायदेशीर बाबी आम्ही तपासून पाहू, असे वक्तव्य सावंत यांनी केले आहे. ‘सदस्य वाचवण्यासाठी विलीनीकरण हाच पर्याय’ असेही ते म्हणाले.
शिवसेना वकील कामत यांनी सांगितलेले महत्वाचे मुद्दे
१. विधानसभा उपाध्यक्षांना कारवाईचे संपूर्ण अधिकार आहे.
२. जोपर्यंत आमदार दुसऱ्या पक्षात विलीन होत नाहीत, तोपर्यंत अपात्रता लागू होते.
३. ‘कोणत्यातरी एका पक्षात विलीन व्हा’ ‘बंडखोरांची आमदारकी रद्द होऊ शकते.