Sun. Jan 16th, 2022

#MerryChristmas : मुंबईतील ‘हे’ चर्च आहे खास, कारण…

मुंबईत अनेक ऐतिहासिक इमारती आणि हेरिटेज दर्जाच्या वास्तू आहेत. मुंबईत उद्योगासाठी आलेल्या ब्रिटीश आणि पोर्तुगिजांनी मुंबईत अनेक ठिकाणी चर्च उभारले (Churches in Mumbai). मुंबईतील अशाच एका खास चर्चची आपण नाताळनिमित्त आपण माहिती घेऊ. या चर्चचं नाव आहे ‘सेंट जॉन द एव्हेंजलिस्ट’. या चर्चचं नाव आधी वेगळंच होतं. एवढंच नव्हे, तर त्या चर्चची उभारणीही वेगळ्याच ठिकाणी झाली होती.

चर्चचा इतिहास

सेंट जॉन द बाप्टीस्ट हे चर्च मॅन्युअल गोमज यांनी 1579 साली बांधलं.

हे चर्च सेंट जॉन द बाप्टिस्ट यांच्या नावे समर्पित केलं गेलं.

अंधेरीतील कोंडीवटे (सीप्झ) या भागात हे चर्च स्थित आहे.

या चर्चमध्ये त्याकाळी तुंगा गाव, बामनवाडा, सहारगाव, आरे या आसपासच्या परिसरातील श्रद्धाळू येत असत.

मात्र 1840 या वर्षी कोंडीवटे (सीप्झ) भागात प्लेगची साथ पसरली आणि अखेर हे चर्च बंद करण्यात आलं.

हे चर्च बंद झाल्यानंतर सेंट जॉन द बाप्टीस्ट चर्च, मरोळ- गावठाण येथे हलवण्यात आले.

फादर जोसी लॉरेनको यांनी 1840 साली मरोळ गावठाण येथे चर्चच्या बांधकामाला सुरुवात केली. 

या चर्चचं बांधकाम 1854 साली पूर्ण झालं.

संपूर्ण बांधकाम पूर्ण होण्यासाठी 14 वर्ष लागली.

येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यांपैकी एक असणाऱ्या सेंट जॉनचं नाव चर्चला देण्यात आलं.

जेव्हा ख्रिस्ताला क्रुसावर चढवण्यात आलं तेव्हा आणि अंतिम यात्रेला सेंट जॉन उपस्थित होते.

‘बायबल’मध्येही सेंट जॉननीच येशू ख्रिस्तांची सुवार्ता लिहिली होती.

चर्चचं वैशिष्ट्य

या चर्चमधील बांधकाम हे पोर्तुगीज शैलीतील आहे. तसेच अल्टरसुद्धा पोर्तुगीज शैलीचंच आहे.

1992 साली या चर्चची दुरुस्ती करण्यात आली होती.

ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर चर्चला चारही बाजूंनी विद्युत रोषणाई केली जाते, सजावट केली जाते.

ज्या गोठ्यात येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. तशाच गोठ्याची प्रतिकृती तयार केली जाते. या प्रतिकृतीची संकल्पना दर वर्षी वेगवेगळी असते.

ख्रिसमसच्या मध्यरात्री 10 वाजता मिस्सा म्हणजे प्रार्थना केली जाते. इंग्रजी, कोकणी आणि मराठी या तीन भाषांतून ही प्रार्थना केली जाते. 

येशू ख्रिस्त यांच्या स्मृतीपर समूह गायन केले जाते. दरवर्षी ख्रिसमसच्या प्रार्थनेसाठी काही हजारोंनी श्रद्धाळू उपस्थित असतात.

ख्रिसमसनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.

तसंच विविध खाद्यपदार्थांचीही रेलचेल असते. ‘पेरुचा हलवा’ ही खास डिश ख्रिसमसला केली जाते.

कसे पोहचाल ?

घाटकोपर आणि अंधेरी येथून मेट्रोने एअरपोर्ट रोड स्थानकावर उतरून चालत गेल्यास 5 मिनिटांवर हे चर्च आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *