Sat. May 15th, 2021

#Metoo : तनुश्री दत्ताचा आता अजय देवगणवर निशाणा

#Metoo या अभियानाअंतर्गत बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरली होती. याच अभियानादरम्यान निर्माती विनता नंदा यांच्याकडून ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला होता. ‘दे दे प्यार दे’ या अजय देवगणच्या आगामी सिनेमामध्ये आलोकनाथ अजय देवगणच्या वडीलांच्या भूमिकेमध्ये दिसणार असल्याच्या चर्चेमुळे तनुश्री अजयवर संतापली आहे. तिने यावेळेस या सिनेमाच्या मेकर्स आणि अजय देवगण ला रडारवर घेतले आहे.

अजयवर का रागावली तनुश्री दत्ता?

बॉलिवूडमध्ये स्वत:वर झालेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी #Metoo हे अभियान सुरू झाले होते.

यामध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ता हीने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

याचदरम्यान ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांच्यावर निर्माती विनता नंदा यांनी बलात्काराचा गंभीर आरोप केला होता.

यामध्ये अनेक सेलिब्रेटीज कडून निषेधसुद्धा व्यक्त करण्यात आला होता.

या निषेध व्यक्त करण्यामध्ये अजयनेही त्याचा निषेध नोंदवला होता.

मात्र आता अजयच्याच ‘दे दे प्यार दे’ या आगामी सिनेमात तो आलोक नाथसोबत काम करत आहे.

या सिनेमात अजयच्या वडिलांच्या भूमिकेमध्ये आलोकनाथ आहे.

याच गोष्टीमुळे तनुश्रीने फिल्म मेकर्स आणि अजयला धारेवर धरले आहे.

 

#Metoo वर यापूर्वी अजयने केलेले ट्विट

 

 

तिच्या मते बॉलिवूड ‘शो ऑफ’ करणाऱ्या ‘खोट्या’ माणसांनी भरलंय.

तिने यावेळेस आलोकनाथ यांच्या सिनेमामध्ये परत काम करण्यावर निराशा व्यक्त केली आहे.

तिच्या म्हणण्यानुसार हा सिनेमा रिलीज होण्याआधी आलोक नाथांच्या कॅरेक्टरला बदलताही येऊ शकलं असतं, त्यांच्या रोलबद्द्ल गोपनीयता ठेवून एखादं दुसऱ्या अभिनेत्याकडून रोल पूर्ण करता आला असता.

पण त्यांनी ते केलेले नाही. याविषयी अजयवर तिने जास्त नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *