Wed. Dec 8th, 2021

‘एमएच ६० रोमियो सी हॉक’ हेलिकॉप्टर देण्यास अमेरिकेची मंजुरी

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यासाठी अमेरिकेने भारताला मदत करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पुन्हा दहशतवादी हल्ला केल्यास पाकिस्तानला सोडणार नाही असे पाकिस्तानला ठणकावले होते. दहशतवादपासून भारताला सुरक्षा मिळण्यासाठी अमेरिकेने भारताला एमएच ६० रोमियो सी हॉक हेलिकॉप्टरची विक्री करण्यास मंजुरी दिली असल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

एमएच ६० रोमियो सी हॉक हेलिकॉप्टरची भारताला विक्री –

अमेरिकेने भारताला २४ ‘एमएच ६० रोमियो सी हॉक’ हेलिकॉप्टरची विक्री करण्यास मंजुरी दिली आहे.

सुमारे २.४ अब्ज डॉलर किमतीचे हेलिकॉप्टर असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भारताला या हेलिकॉप्टरची गरज होती.

लॉकहिड मार्टिनव्दारे निर्मित हे हेलिकॉप्टर पाणबुडी आणि जहाजांवर अचूक निशाणा साधण्यास सक्षम आहे.

हे हेलिकॉप्टर जगातील सर्वात अत्याधुनिक समुद्री हेलिकॉप्टर मानले जाते.

या हेलिकॉप्टरमुळे भारतीय संरक्षण दल आणखी मजबूत होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या हेलिकॉप्टरच्या विक्रीमुळे भारत आणि अमेरिकेमधील संबंधात सुधारणा होणार असल्याचे म्हटलं आहे.

हे हेलिकॉप्टर जगातील सर्वांत अत्याधुनिक समुद्री हेलिकॉप्टर मानले जातात.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *