Fri. Jan 22nd, 2021

नव्या वर्षात मुंबईत म्हाडाची फक्त ‘एवढीच’ घरे

नव्या वर्षांत MHADA मुंबईकरांसाठी फक्त 59 घरं उपलब्ध करून देत आहे. तर ठाण्यात जेमतेम 32 घरं मिळू शकणार आहे. गिरणी कामगारांसाठी मुंबईत यंदा 3,835 घरं सोडतीद्वारे मिळणार आहेत. कोकण मंडळाअंतर्गत 6,455 घरांची सोडत निघण्याचीही शक्यता आहे.

‘मुंबईकरांसाठी म्हाडा 2022-23 मध्ये 7 ते 8,000 घरं उपलब्ध करून देऊ शकतं’, असं मुंबई गृहनिर्माण मंडळाचे कार्यकारी अभियंता भूषण देसाई यांनी स्पष्ट केलं. 

गोरेगाव येथील पत्रा चाळ प्रकरणात निवासयोग्य प्रमाणपत्र नसल्याने 360 रहिवाशांना ताब्यासाठी रखडावं लागलं.

हा अनुभव समोर ठेवून यापुढे निवासयोग्य प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय सोडतीसाठी घरं उपलब्ध करून द्यायची नाहीत, असा धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याचेही देसाई यांनी सांगितलं.

गिरणी कामगारांसाठी काही घरं

मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून गिरणी कामगारांसाठी काही घरे मिळणार आहेत.

याशिवाय बॉम्बे डाईंग (Bombay Dying) , स्प्रिंग मिल (Spring Mill) प्रकल्पात 3,350 तर श्रीनिवास मिल प्रकल्पात 485 घरं मिळणार आहेत.

ही घरं सोडतीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

MHADA कडे सध्या एकही भूखंड सामान्यांच्या घरांसाठी उपलब्ध नाही.

जी 59 घरे नव्या वर्षांत उपलब्ध झाली आहेत.

ती पुनर्विकास प्रकल्पातील घरांचा साठा आहे.

कन्नमवार नगर (विक्रोळी) आणि पंतनगर (घाटकोपर) येथे ही घरे उपलब्ध असल्याचंही देसाई यांनी स्पष्ट केले.

आणखी कुठे सुरू आहे काम?

गोरेगाव पहाडी परिसरात 5000 घरांचे बांधकाम सुरू आहे.

ही घरं 2021 किंवा 2022 मध्ये मिळू शकतात.

पवई येथील पॉपकॉर्नचा भूखंडही कायदेशीर लढाई करून म्हाडाने ताब्यात मिळविला आहे.

या भूखंडावर 10,000 घरांची निर्मिती होऊ शकते.

याशिवाय कुर्ला येथेही एक भूखंड ताब्यात आला आहे. 2 ते 3,000 घरे निर्माण होऊ शकतात.

याकडेही देसाई यांनी लक्ष वेधले.

मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकासही MHADA कडूनच होणार आहे.

BDD चाळींतून 9000 घरं उपलब्ध होणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

कोकण गृहनिर्माण मंडळाकडून कल्याणमधील शिरढोण येथे 5 हजार तर खोणी, भंडार्ली येथे 1136 घरं नवीन वर्षांत सोडत काढली जाणार आहे.

याशिवाय माणकोळी – भिवंडी (279), घणसोली (40), वसई (15) येथील घरेही उपलब्ध झाली असून ती नवीन वर्षांत सोडतीसाठी उपलब्ध असणार आहेत.

याशिवाय राज्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अडीच लाख घरे उपलब्ध होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *