Sat. Jun 12th, 2021

म्हाडाची 5,647 घरांसाठी सोडत, आजपासून नोंदणी सुरू

म्हाडाची 5,647 घरांसाठी सोडत

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे: पुणे विभागात 5 हजार 647 घरांसाठी म्हाडाच्या वतीने काल सोडत काढण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी या सदनिकांसाठी अर्ज नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला.


आज 11 डिसेंबर ते 11 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज नोंदणी करता येईल. तर 12 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येईल. https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्जाची नोंदणी करता येईल.


-प्रधानमंत्री आवास योजनेतून पुणे जिल्ह्यात म्हाळूंगे (चाकण) 514, तळेगांव दाभाडे 296, लापूर जिल्हयात गट नं. 238/1, 239 करमाळा येथे 77 तर सांगली येथे स.क्र.215/3 येथे 74 सदनिका


-म्हाडा अंतर्गत पुणे येथील मोरवाडी पिंपरी 87, पिंपरी वाघेरे 992, सांगली 129 सदनिका
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजतेंतर्गत पुणे जिल्हयात महाळुंगे येथे 1880, दिवे येथे 14 तर सासवड येथे 4 सदनिका आहेत. सोलापूर जिल्हयात 82 सदनिका आहेत, अशा एकूण 1980 सदनिका आहेत.


20 टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत पुणे महानगरपालिका येथे 410, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे 1020 तर कोल्हापूर महानगरपालिका येथे 68 अशा एकूण 1498 सदनिका आहेत.-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *