Mon. Jul 26th, 2021

कोल्हापूरमध्ये महाडिक – पाटील गटात सोशल वॉर सुरू, ऋतुराज पाटलांचे ‘हे’ फोटो व्हायरल

कोल्हापूरमध्ये महाडीक आणि पाटील गटात नेहमीच वाद होत असतात. या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांनी पुतण्या ऋतुराज पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

कोल्हापूरमध्ये महाडीक आणि पाटील गटात नेहमीच वाद होत असतात. या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांनी पुतण्या ऋतुराज पाटील यांना उमेदवारी दिली आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते अर्ज भरत आहेत.

दक्षिण कोल्हापूर मतदारसंघातून ऋतुराज पाटील काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. महाडिक आणि सतेज पाटील गटात राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय. त्यातून सोशल मीडीयावरती एकमेकांवर टीकेचे सत्र सुरुच असते.

दक्षिण मतदार संघातून आज आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे सायकलवरून जाऊन अर्ज भरणार आहेत.मात्र तत्पूर्वीच महाडिक आणि पाटील गटात सोशल वार सुरू झालंय. आमदार सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांची सायकलवरील कार्टून्स तयार करून ती व्हायरल केली जात आहेत.

रिक्षात बसलेला,त्यानंतर सायकलवर बसलेला आणि म्हैशीवर बसलेला फोटो तयार करून पाटील गट नौटंकी करत असल्याची टीका होतेय.नेहमीच महाडिक आणि सतेज पाटील गटात राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय.विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हा संघर्ष आता पुन्हा उफाळून आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *