Sat. Jul 11th, 2020

MHT-CET परीक्षेचा निकाल जाहीर

MHT-CET  परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ही परीक्षा अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा देण्यात येते. 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. या परीक्षेत मुंबईची किमया शिकारखाने आणि अमरावतीचा सिद्धेश अग्रवाल टॉपर झाले आहेत.

MHT-CET चा निकाल जाहीर –

राज्याच्या प्रेवश परीक्षा कक्षातर्फे MHT-CET या परिक्षेचे आयोजन केले होते.
यामध्ये 4 लाख 13 हजार 284 विद्यर्थ्यांनी या परिक्षेसाठी नोंदणी केली होती.
यापैकी 3 लाख 92 हजार 358 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
या परीक्षेसाठी 20 हजारहून अधिक विद्यार्थी अनुपस्थि राहिले.
पीसीएम विभागातून 2 लाख 73 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून पीसीबी विभागातून 2 लाख 81 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
या परीक्षेचा निकाल www.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हा निकाल उपलब्ध आहे.
या परीक्षेच्या उमेदवारांना त्यांचा स्कोअर, रॅंक आणि क्वलिफिकेशन स्टेटससह स्कोअरकार्ड  उपलब्ध आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *