Tue. Aug 20th, 2019

#MIvSRH : सुपरओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा विजय!

0Shares

वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद या सामन्यात मुंबई इंडियन्सने हैदराबादला नमवून प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला आहे.

कसा रंगला हा सामना?

नाणेफेक जिंकून Mumbai Indians ने प्रथम फलंदाजी स्वीकारली.

सहाव्या ओव्हरमध्ये खलील अहमदने रोहित शर्माला बाद केलं.

बाराव्या over मध्ये खलील अहमदनेच सूर्यकुमार यादवला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

तेराव्या षटकात महंमद नबीने लेविसला बाद केलं.

हार्दिक पंड्या आणि कायरन पोलार्डही फारशी कमाल करू शकले नाहीत.

कृणाल पंड्याने तीन बॉल्समध्ये 9 धावा करत मुंबईला 162 धावांच्या टप्प्यापर्यंत पोहोचवलं.

क्विंटन डीकॉकने एका बाजूने किल्ला लढवून 58 चेंडूंत 6 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 69 धावा केल्या.

मुंबईच्या 163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जसप्रीत बुमराहने वृद्धिमन साहा आणि मार्टिन गप्टीलला माघारी पाठवलं.

यानंतर कृणाल पंड्याने केन विल्यमसन आणि विजय शंकरच्या विकेट घेतल्या.

हार्दिक पंड्याने अभिषेक शर्माला बाद केलं.

मनीष पांडे आणि महंमद नबी यांची जोडी टिकून राहिली.

शेवटच्या 2 ओव्हर राहिल्या असताना 12 बॉल्समध्ये 29 runsची गरज असताना मनीष पांडेने बुमराहला सलग 2 fours लगावल्या.

त्यामुळे हैदराबादला अखेरच्या over मध्ये 17 धावांची गरज होती.

पुन्हा नबीने तिसऱ्या बॉलवर सिक्सर मारली.

पण चौथ्या चेंडूवर तो आऊट झाला.

त्याने 20 बॉल्समध्ये 31 runs केल्या.

हैदराबादला अखेरच्या 2 बॉल्समध्ये 9 धावांची गरज होती.

पाचव्या बॉलवर मनीष पांडेने 2 runs काढल्या.

शेवटच्या बॉलवर पांडेने सिक्सर लगावली.

त्याने 47 बॉल्समध्ये 8 boundaries आणि 2  सिक्सर्स मारत नाबाद 71 धावा केल्या.

मात्र सुपरओव्हरपर्यंत रंगलेल्या या अटीतटीच्या सामन्यात Mumbai Indians ने विजय मिळवला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *