Mon. Jul 22nd, 2019

IPL 2019 : अंतिम सामन्यात मुंबईचा चेन्नईवर सुपर विजय

0Shares

मुंबई इंडियन्स अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला एका धावेने पराभव करुन आयपीएलमध्ये विजयी ठरली. हा सामना अत्यंत चुरशीचा ठरला. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत चेन्नईसमोर 150 धावांचे आव्हान दिले होते. या लढतीत चेन्नईला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची गरज होती. लसिथ मलिंगाने विजयाचा चौकार
लगावला आणि मुंबई विजयी ठरली. हैदराबाद शहरातील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा लढा झाला आहे.

मुंबईचं चेन्नईसमोर 150 धावांचं आव्हान

त्याआधी मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी चौथ्या षटकातच ४५ धावा काढल्या,

क्विंटन डीकॉक २९, तर रोहित शर्माने १५, धावांची भागीदारी केली.

शार्दूल ठाकूरने डी कॉकला तर दीपक चहरने रोहितला माघारी धाडले.

यानंतर सूर्यकुमार यादव १५ आणि ईशान किशन २३ यांनी धावा काढल्या.

चेन्नईच्या इम्रान ताहिरने या दोघांनाही माघारी धाडलं.

अखेरच्या षटकांत किरॉन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांनी चांगली फटकेबाजी केली.

किरॉन पोलार्ड 41 आणि हार्दिक पांड्या 16 धावा काढल्या.

मुंबईने 20 षटकांत 8 विकेट गमावून 149 आव्हान चेन्नईसमोर ठेवले.

चेन्नईचा विजय थोडक्यात हुकला..

150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर फाफ डु प्लेसिस याने चांगली सुरूवात केली.

डू प्लेसिसला 26 धावांवर कृणाल पांड्याने आपल्या गोलंदाजीवर डी कॉकने त्याला माघारी धाडले.

शेन वॉटसनने चांगली फलंदाजी सुरु ठेवत 44 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.त्याने 80 धावा काढल्या.

सुरेश रैना 8, अंबाती रायडू 1, आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी 2 असे एक एक खेळाडू तंबूत परतले.

शेवटच्या चेंडूवर २ धावा हव्या असताना मलिंगाने चौकार देत मुंबईला विजय मिळवून दिला.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: