Mon. Dec 6th, 2021

पॉर्नस्टार मिया खलिफाचा प्रियांका चोप्राला सवाल

दिल्लीत सिंघु बॉडरवर होत असलेल्या आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळतं आहे. मागच्या आठवडयात मिया खलिफाने रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग पाठोपाठ शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे टि्वट केल्यानंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले.‘आमच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप नको’ अशा शब्दात तिला सुनावण्यात आलं. पण त्यानंतर मियाने काल पुन्हा एकदा समोसा, गुलाबजाम हे भारतीय पदार्थ खाऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. आणि आता प्रसिद्ध पॉर्नस्टार मिया खलिफाने चक्क प्रियांका चोप्राला सवाल केला आहे.

‘मिसेस जोनास’ तुम्ही कधी बोलणार आहात? मला उत्सुक्ता लागून राहिलीय. बेरुत उद्धवस्त झालं, त्यावेळी शकीरा शांत होती, हे मला तसं वाटत आहे असं मियाने तिच्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान प्रियांकाने डिसेंबर महिन्यात शेतकरी आंदोलनाबद्दल टि्वट केले होते. प्रियांकाने ट्विटमध्ये म्हटलं होतं की, “आपले शेतकरी हे भारताचे फूड सोल्जर्स आहेत. त्यांची भीती दूर करणं आवश्यक आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. लोकशाही देश म्हणून हे संकट लवकरात लवकर दूर होईल याची काळजी घेणं आवश्यक आहे”. प्रियांका चोप्राचं हे ट्विट दिलजीतने रिट्विट केलं आहे.

प्रियांकाचे शेतकरी आंदोलनाबद्दलचे शेवटचे वक्तव्य डिसेंबर महिन्यात आले होते. मात्र सध्याला प्रियंकाने यावर काहीही प्रतिक्रिया दिलं नाही आहे. त्यामुळे मियाने प्रियंकाला सवाल केला आहे. आता यावर प्रियंका काय प्रतिक्रिया देणार यावर सर्वांच लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *