Mon. Mar 1st, 2021

मिक्का सिंगने कंगणा रणौत ट्विटवर सुनावले

कंगणा रणौत आणि मिक्का सिंगचा ट्विट वॉर

कंगणा रणौत नेहमीचं तिच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असते शेतकरी आंदोलनावरुन अभिनेता दिलजीत दोसांज आणि कंगणा रणौत यांच्यामध्ये ट्विटर वॉर सुरु होते आता यात गायक मिक्का सिंगने सुद्धा उडी घेतली आहे. मिक्काने नुकताच एक ट्विट केले आहे या ट्विटमध्ये कंगणाला मिक्काने चांगलंच सुनावले आहे.

या ट्विटमध्ये मिक्काने लिहलं आहे. “आपल्या सर्वांचा हेतू शेतकऱ्यांना समर्थन करण्याचा आहे. त्यामुळे सर्वांनी तेथे लक्ष केंद्रीत करा. ती वेडी आहे, त्यामुळे तिला तिचे आयुष्य जगू द्या. बेटा कंगना तू करण जोहर, रणवीर सिंह, हृतिक रोशन आणि बॉलिवूडमधील इतर कलाकरांना ‘सॉफ्ट टारगेट’ करतेस. पण माझ्या बाबतीत असे होणार नाही” असं ट्विट करून पुन्हा एकादा वाद होणार असं दिसत आहे. कारण यापुर्वी सुद्धा कंगणा हिने बॉलीवूडमधील कलाकारांना चांगलेचं धारेवर धरले होते. मिक्का सिंगने केले आजवर २० लोकांना तरी मदत केली आहेस का? असा सवाल त्याने कंगनाला केला होता.

“आम्ही दिवसाला पाच लाखांपेक्षा अधिक लोकांना जेवण देतो. तू किमान २० लोकांना तरी मदत कर. सोशल मीडियावर स्वत:ला वाघिण म्हणतेस. वाघिण होणे सोपे आहे पण दररोज लोकांना मदत करण सोप नाही” अशा आशयाचे ट्विट करुन मिक्काने कंगनावर निशाणा साधला होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *