Sun. Jun 20th, 2021

मिलिंद देवरा यांनी मुंबई कॉंग्रेस अध्यक्षपदाचा दिला राजीनामा

मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष मिलिंदा देवरा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पदाचा राजीनामा दिला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी मिलिंद देवरा यांना कॉंग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र त्यांच्यावर नवीन जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे म्हटलं जात आहे.

मिलिंद देवरा यांचा राजीनामा –

लोकसभा निवडणुकीपूर्वी मिलिंद देवरा यांना मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले होते.

मात्र मिलिंद देवरा यांनी आज कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

मिलिंद देवरा यांच्यावर नवीन जबाबदारी सोपवणार असल्याची चर्चा सुरू आहे.

राजीनामा देताना विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई कॉंग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी तीन सदस्यीय पॅनेल मांडण्यात आला आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *