Fri. Jan 21st, 2022

मिलिंद देवरांकडून मोदींचे कौतुक; ह्यूस्टनमधील कार्यक्रमाबाबत ट्विट

अमेरिकेतील टेक्सासच्या ह्यूस्टनमध्ये हाऊडी मोदी कार्यक्रम पार पडल्यानंतर अनेकांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले तर विरोधकांनी प्रचंड टीकास्त्र सोडले आहे. मात्र कॉंग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी मोदींचे ट्विटद्वारे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे मोदींनी मिलिंद देवरा यांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिलिंद देवरा यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देत मुरली देवरा यांचे कौतुक केले.

काय आहे मिलिंद देवरा यांचं ट्विट ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्यूस्टनमध्ये केलेले भाषण महत्त्वपूर्ण आहे.

माझे वडिल मुरली देवरा यांचा सुद्धा भारत- अमेरिकेमधील संबंध मजबूत करण्यात मोठा हातभार आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आदरातिथ्यपणा आणि अनिवासी भारतीयांची एक वेगळी ओळख दाखवल्यामुळे आम्हाला अभिमान वाटत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रत्युत्तर –

मिलिंद देवरा यांना धन्यवाद म्हणत मुरली देवरा यांनी भारत-अमेरिकेतील संबंध मजबूत करण्यात मोलाचा वाटा असून त्यांना हे पाहून खूप आनंद होत असल्याचे मोदी म्हणाले.

तसेच @POTUS यांचा आदरातिथ्यपणा खूप छान असल्याचे मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मिलिंद देवरा यांच्या या ट्विटमुळे कॉंग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचे म्हटलं जात आहे.

लवकरच मिलिंद देवरा भाजपात प्रवेश करणार असल्याचे शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *