Jaimaharashtra news

दुधाचे भाव रु. 140 लीटर!

भारतावर हल्ला करायच्या धमक्या देणाऱ्या पाकिस्तानची आर्थव्यवस्था इतकी बिघडली आहे, की लोकांना सर्वसामान्य गोष्टींसाठीही झगडावं लागतंय. पाकिस्तानात मोहरमच्या दरम्यान दुधाचे दर आभाळाला भिडले होते. इतके की पेट्रोल आणि डिझेलही त्यापेक्षा स्वस्त होतं.

 पाकिस्तानात पेट्रोल, डिझेलपेक्षा दूध महाग

पाकिस्तानात एक लिटर दुधाची किंमत चक्क 140 रुपये इतकी झालीय.

पेट्रोलचे भाव 117.83 रुपये तर डिझेल चे भाव 132.47 प्रतिलिटर आहेत. म्हणजेच दुधाचे भाव हे पेट्रोल आणि डिझेल याच्यापेक्षाही जास्त आहेत.

मोहरमच्या काळात पाकिस्तान सरकारने दुधाचे भाव कमी केले होते. तरीही एक लिटर दुधची किंमत 100 ते  120 रुपये होती.

पाकिस्तानात दुधाच्या दरासोबत पेट्रोल आणि डिझेलचे ही दर तात्पुरते सप्टेंबर महिन्यासाठी कमी करण्यात आले आहे. पेट्रोलचे दर हे 4.59 रुपये आणि डिझेलचे दर 5.33 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. अशी परिस्थिती असनाताही पाकिस्तानचे मत्री भारतावर टीका करण्यात आणि चांद्रयान2ची खिल्ली उडवण्यात व्यस्त होते. आपली अर्थव्यवस्था डबघाईला आली असतानाही ते काश्मीर मुद्द्यावरून भारताशी लढण्याची भाषा करत आहेत. यापेक्षा आपल्या देशाच्या विकासावर त्यांनी भर देणं जास्त आवश्यक आहे.

Exit mobile version