Jaimaharashtra news

दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन

नवी दिल्ली: भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे निधन झालं. त्यांच वय हे ८५ वर्षे होते. काही दिवसांपूर्वी मिल्खा सिंग आणि त्यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर मोहाली येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांनी अखेर श्वास घेतला. निर्मल मिल्खा सिंग यांच्या निधनाबाबतची बातमी ही त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. निर्मल मिल्खा सिंग यांच्या निधनाबाबत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून मिल्खा सिंग यांच्यावर आता सुद्धा रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मिल्खा सिंग यांच्याशी फोनवरुन संवाद साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी मिल्खा सिंग लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना केली. मिल्खा सिंग लवकरच आजारातून मुक्त होऊन टोकिओ ऑलम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवतील, असंही मोदींनी म्हटलं.

Exit mobile version