Jaimaharashtra news

गिरणी कामगारांच्या ३ हजार ८४९ घराची सोडत आज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (१ मार्च) सोडत होणार आहे. गिरणी कामगारांसाठी ही सोडत असणार आहे. एकूण ३ हजार ८४९ म्हाडाच्या घरांची सोडत असणार आहे.

वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात सकाळी ११ वाजता हा सोडतीचा कार्यक्रम पार पडणार आहे.

बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल, स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागांवर ३ हजार ८९४ सदनिका उभारण्यात आल्या आहेत.

या उभारण्यात आलेल्या सदनिकांसाठी ही सोडत असणार आहे.

या सोडतीच्या वेळेस म्हाडा मुख्यालयाच मुंबई पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित असणार आहेत.

Exit mobile version