Wed. Oct 5th, 2022

राज्यसभा निवडणुकीत एमआयएमचा पाठिंबा मविआला

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकारण चांगलच तापलं आहे. आज शुक्रवारी महाराष्ट्रात २४ वर्षांनी राज्यसभा निवडणूक पार पडत आहे. मात्र, राज्यसभेच्या निवकडणुकीत जागा सहा आहेत, मात्र सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे दोघात तिसरा, आता सौहार्द विसरा? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीबाबत एमआयएमने भूमिका ठरवली आहे. राज्यसभा निवडणुकीत एमआयएमचा पाठिंबा मविआला असल्याची घोषणा इम्तियाज जलील यांनी केली आहे. इम्तियाज जलील यांनी ट्विट करत राज्यसभा निवडणुकीत मविआला पाठिंबा करणार असल्याचे जाहीर केले आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मविआबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकार निधी वाटपात पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. तसेच राज्यसभेत कोणत्या पक्षाला पाठिंबा करणार याबाबत पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी निर्णय घेणार असल्याचे जलील म्हणाले होते. दरम्यान, आता राज्यसभा निवडणुकीत मविआला पाठिंबा देणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी जाहीर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.