Wed. Jun 23rd, 2021

MIM विधानसभा स्वबळावर लढणार

विधानसभा निवडणूक तोंडावर असताना वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये ही घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये अनेक बैठका झाल्या. मात्र जागा वाटपाच्या मुद्यावरुन आघाडीत बिघाडी झाल्याचे इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या आघाडीत बिघाडी –

लोकसभा निवडणुका एकत्र लढल्यानंतर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे.

प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यामध्ये जागा वाटपावरुन अनेक बैठका पार पडल्या.

मात्र जागा वाटपाचा तिढा सुटला नसल्यामुळे तसेच मागणी पूर्ण होत नसल्यामुळे स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एमआयएमसोबत निवडणूक लढवल्यानंतरही मुस्लीम मते मिळाली नव्हती.

आपण मागितल्या तेवढ्या जागा मिळत नसल्याने एमआयएम नाराज झाले असल्याचे इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला सुरुवात केली असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *