Wed. Oct 5th, 2022

धृविकरणासाठी एमआयएमचा राक्षस उभा केला – राज ठाकरे

राज ठाकरे यांची आज पुण्यात जाहीर सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी औवेसीने औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्याच्या मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी, धृविकरणासाठी एमआयएमचा राक्षस उभा केला असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी राज ठाकरेंनी मविआवर निशाणा साधला.

औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्याप्रकरणी राज ठाकरे यांनी ओवैसीला चांगलेच फटकारले आहे. तसेच याप्रकरणी महाराष्ट्रात कहीच हालचाली घडल्या नाही, यामुळे मविआवर जोरदार टीका केली. हे प्रकरण घडत असताना आपण थंड लोण्याच्या गोळ्यासारखं बसलो आहोत, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. तसेच राज ठाकरे म्हणाले, ‘आमच्याच महाराष्ट्रात एमआयएमची अवलाद येते आणि आमच्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी आलेल्या औरंगजेबाच्या कबरीवर डोकं ठेवते. याची आम्हाला लाज, शरम काहीच वाटत नाही.’

राज ठाकरे म्हणाले, ‘शरद पवार म्हणातात की अफजलखान हा छत्रपती शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता, तो आपला धर्म वाढवण्यासाठी आला होता. या राजकरणामुळे निजामांच्या अवलादी राज्यात वळवळ करू लागल्यात,’ असा टोला राज ठाकरेंनी शरद पवारांवर लावला आहे. ओवैसीने औरंगेजबाच्या कबरीचे दर्शन घेतले. मात्र, याप्रकरणी राज्यात कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. असे म्हणत, पवारांना औरंगजेब सुफीसंत वाटतो, असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे. तसेच पवारांनी अफझलखानाचे उदात्तीकरण केले असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.