Sun. Jun 20th, 2021

निवडणुकीच्या वातावरणात सोशल मीडियावर व्यक्त होताना ‘हे’ लक्षात ठेवा…

सोशल मीडियावर मेसेज फ़ॉर्वर्ड करताना काळजी घ्या. पोलिसांची आता तुमच्या मेसेजेसवर नजर असणार आहे. आक्षेपार्ह मजकूर टाकल्यास कारवाई होणार आहे.

निवडणुकांचं बिगुल वाजलेलं असतानाच, सोशल मीडियावरही निवडणुकांचं वातावरण तापू लागलंय. मात्र यावर पोलिसांनी बारीक लक्ष ठेवायला सुरूवात केली आहे. नाशिक पोलिसांनी आता सोशल मिडीयावर द्वेषपूर्ण तसंच दोन समाजांत तेढ निर्माण करणाऱ्या नेटीझन्सवर खास नजर ठेवण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी पोलीसांनी विशेष पथकांचीही स्थापना केली आहे.

सोशल मीडियावर वादग्रस्त आणि अक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यांना थेट कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.

लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाली असली, तरी सोशल मीडियावर येणाऱ्या मेसेजेसवर मात्र कोणतीही आचारसंहिता नाही.

याचाच फायदा घेत अनेक नेटीझन्स अक्षेपार्ह मजकूर टाकतात. अनेकदा अशा मजकुराला सर्रासपणे फॉर्वर्डदेखील केलं जातं.

मात्र यामुळे संघर्ष निर्माण होऊन अनेकदा त्यांचं पर्यावसान मोठ्या दंगलींमध्ये रूपांतर होण्याची भीती असते.

याच पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी निवडणुक काळात सोशल मिडीयावर वॉच ठेवण्याचा निर्णय़ घेतला आहे.

मोठ्या नेत्यांबद्दल, पक्षांबद्दल, किंवा व्यक्तिगत टीका टिप्पणी करुन तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात थेट कारवाई होणार आहे

सोशल मिडीयावर सुरू असलेल्या पॉलिटिकल वॉर मधे अनेकदा वैयक्तिक टिका टिप्पणी केली जाते.

शिवाय अनेकदा मोठ्या नेत्यांचे फोटो वापरुन अश्लिल मेसेज देखील व्हायरल केले जातात.

यासाठीच नाशिक पोलिसांचं विशेष पथक कार्यरत असणार आहे.

सोशल मिडीयावरच्या प्रत्येक बारीक गोष्टींवर वॉच ठेवला जाणार आहे. त्यामुळे नेटीझन्सला आपल्या भावनांना आवर घालावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *