Thu. Sep 29th, 2022

कोणी म्हटल्याने सरकार बरखास्त होत नाही – बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे प्रदेक्षाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा समाचार घेतला आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी केलेलं वक्तव्य हे वैफल्यग्रस्त असल्याने केलं आहे. सत्ता गेल्याने भाजपचे नेते वैफल्यग्रस्त झाले असल्याचं विधान बाळासाहेब थोरातांनी केलं आहे. याबाबतीत त्यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे.

लोकशाहीच्या पद्धतीने हा देश चालतो आहे. केंद्रातील कोणताही नेता स्वत:ला सर्वश्रेष्ठ मानत असेल, पण राज्यघटनाच ही सर्वोच्च असल्याचं थोरात म्हणाले.

कामकाज राज्यघटनेनुसार चालणार आहे. कोणी म्हटल्याने सरकार बरखास्त होत नाही, असा टोला देखील थोरात यांनी मुनगंटीवार यांना लगावला.

नक्की प्रकरण काय ?

भीमा कोरेगाव हिंसाचाराचा तपाास एनआयएकडे  सोपवला आहे. पण या प्रकरणाला राज्य सरकारचा विरोध  आहे.  राज्य सरकार एनआयएला सहकार्य करत नसेल तर राज्य सरकारला कारवाईला सामोरं जावं लागणार असल्याची प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली होती. 

या प्रतिक्रियेवरुनच थोरात यांनी मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला.

अधिक वाचा : महाविकसआघाडीत नाराजी नाही – बाळासाहेब थोरात

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.