Tue. Jun 28th, 2022

मंत्री एकनाथ शिंदे नॉटरिचेबल

शिवसेनेत फूट पडत असल्याची चर्चा जोरात सुरू असताना आता दुसरीकडे आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.राज्यसभा, व विधानपरिषदेच्या निकाला चा महाविकास आघाडीला फटका बसला आहे. याच मुख्य कारण एकनाथ शिंदे यांची नाराजी अस समजते. विधानपरिषदेच्या निकलानंतर एकनाथ शिंदे गायब आहेत अशी सुत्रांची माहिती समोर आली आहे .एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही आमदारही असल्याची माहिती आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांना फोनवर संपर्क केल्यानंतर गुजराती भाषेतील टोन ऐकू येत आहे. त्यामुळे ते गुजरातमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही आमदारही असल्याची माहिती आहे.

विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस बाहेर येत असल्याचे वृत्त समोर येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे वृत्त होते. त्यातच आता त्यांचे समर्थक समजले जाणारे १३ आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिंता आणखी वाढली आहे. मध्यरात्री वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदारांची बैठक पार पडली. मंगळवारीही शिवसेनेची बैठक होत आहे. सोमवारी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने आपले दोन्ही उमेदवार विजयी करण्यात यश मिळवले. मात्र, या निवडणुकीत काँग्रेससोबत शिवसेनेचेही मते फुटली असल्याने एकनाथ शिंदेच्या नाराजीला महत्व आले आहे.

एकनाथ शिंदे समर्थक आमदार

1. शहाजी बापू पाटील

2. महेश शिंदे सातारा

3. भरत गोगावले

4. महेंद्र दळवी

5. महेश थोरवे

6. विश्वनाथ भोईर

7. संजय राठोड

8. संदीपान भुमरे

9. उदयसिंह राजपूत

10. संजय शिरसाठ

11. रमेश बोरणारे

12. प्रदीप जैस्वाल

13. अब्दुल सत्तार

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.