Tue. Sep 27th, 2022

लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे ; जंयत पाटलांचा मोदींवर निशाणा

कोरोनाचा पादुर्भाव वाढतोय. आव्हानानंतरदेखील लोकं बाहेर पडतायेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी मंगळवारी रात्री ८ वाजता जनतेसोबत संवाद साधला. यादरम्यान त्यांनी संपूर्ण देशभरात पुढील २१ दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली. या लॉकडाऊनच्या घोषणेवरुन मंत्री जयंत पाटील यांनी मोदींवर टीका केली आहे.

काय म्हणाले जयंत पाटील ?

जगभरातील कोरोना व्हायरस प्रादुर्भावाचा विचार करता, देशातील लॉकडाऊन हे आधीच जाहीर करायला हवं होतं. लॉकडाऊन रात्री 8 वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे. सकाळी या गोष्टी जाहीर करून जनतेला तयारीसाठी वेळ द्यायला हवा होता, असं जयंत पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात कोणत्याही बाबींची सविस्तर स्पष्टता दिलेली नाही. देशभर अत्यंत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोक सैरभैर होऊन मोठ्या प्रमाणावर किराणा मालाच्या दुकानांकडे धाव घेऊन साठा करण्याचा प्रयत्न करत आहेत.

जीवनावश्यक गोष्टींच्याबाबत पंतप्रधानांच्या घोषणेमध्ये स्पष्टता अत्यंत आवश्यक होती. देश एका संकटाला तोंड देत असताना देशाच्या सर्वाच्य नेतृत्वाने अपुरी माहिती दिल्याने, देशात अनागोंदी निर्माण झाली आहे, अशा शब्दात मोदींवर जयंत पाटील यांनी टीका केली.

पण तरीही महाराष्ट्रातील जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही, असा विश्वास त्यांनी आपल्या ट्विटमधून व्यक्त केला.

जीवनावश्यक सेवा सुरू राहतील

महाराष्ट्रात गेले दोन दिवस लॉकडाऊन सुरूच आहे. पुढील काळातही जनतेच्या सर्व जीवनावश्यक सेवा सुरू राहतील. हे सरकार जनतेला जिवनावश्यक सुविधांच्या बाबतीत कोणताही त्रास होऊ नये यासाठी कटिबद्ध आहे, असंही जयंत पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

दरम्यान राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे सर्वांनी घरीच राहा, अशी कळकळीची विनंती पंतप्रधान मोदींनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.