Thu. Oct 21st, 2021

इंदिरा गांधीनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता – जितेंद्र आव्हाड

इंदिरा गांधीनी देशाच्या लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता,असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादीचे गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. ते बीडमधील संविधान बचाव महासभेत बोलत होते.  

काय म्हणाले आव्हाड ?

इतिहासात इंदिरा गांधींनी देशाचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा देशात कोणीही बोलायला तयार नव्हतं. मात्र अहमदाबादच्या आणि पटनाच्या विद्यार्थ्यानी आवाज उठवला.

आवाज उठवल्यानंतर जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन सुरु झाले आणि इंदिरा गांधी यांचा पराभव झाला. हा इतिहास परत एकदा महाराष्ट्रात आणि देशात घडेल. यांचे श्रेय जे एन यु, हैद्राबाद यूनिवर्सिटीला द्यावा लागेल.

बीड मधील संविधान बचाव महासभेला संबोधित करताना बोलत होते.

आव्हाड म्हणाले की, देशात मोदी शहा हे जेएनयु विद्यापीठाला घाबरतात. कारण सळसळते रक्त आणि बुद्धीमान लोकांना हे सरकार घाबरते.

नेस्तनाबूत करण्यासाठी जेएनयुमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला. जेव्हा विद्यार्थी आणि महिला आंदोलनात सहभागी होतात, तेव्हा होणारी क्रांती कोणीच रोखू शकत नाही, असे ही आव्हाड म्हणाले. 

इंदिरा गांधीचा पराभव देखील याचं विद्यार्थ्यांनी केला होता हा देशाचा इतिहास आहे असं ही आव्हाड म्हणाले.

दरम्यान जितेंद्र आव्हाडांच्या या विधानाचं खुलासा मागणार आहेत.

अशी माहिती काँग्रेस प्रवक्ता डॉ. राजू वाघमारे यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीशी बोलताना दिली.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *