Fri. Oct 7th, 2022

आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही – जितेंद्र आव्हाड

आशिष शेलारांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या त्या विधानावरुन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. जितेंद्र आव्हाडांनी ट्विटद्वारे शेलारांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

काय म्हणाले आव्हाड ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बापाचं राज्य आहे का, असं जाहीर निवेदन करणं आशिष शेलार यांना शोभत नाही. तसंच आम्ही मराठी मातीला आई आणि मराठी माणसाला बाप मानण्याची आमची संस्कृती असल्याचंही आव्हाड म्हणाले.

आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाहीत, असा टोलाही आव्हाडांनी शेलारांना लगावला. हातात सत्ता नसल्याने भाजप नेते अस्वस्थ असल्याचंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आशिष शेलारांना सल्ला दिला आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

मुख्यमंत्रीपदाचा मान आपल्या सर्वांना ठेवायला पाहिजे. मग ते पक्षातले नेते असोत किंवा विरोधी पक्षातले. आशिष शेलारांनी शब्द जरा जपून वापरायला हवेत, असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी आशिष शेलार यांना दिला.

आझाद मैदानावरील मराठा विद्यार्थी आंदोलकांची सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

आशिष शेलार काय म्हणाले होते ?

सीएए आणि एनआरसी हा कायदा केंद्र सरकारचा कायदा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे?, अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का ? असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं होतं.

आशिष शेलारांनी रविवारी नालासोपऱ्यातील एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं होतं.

अधिक वाचा : आशिष शेलारांनी ‘त्या’ वक्तव्यावरुन मागितली माफी

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.