Tue. Jul 27th, 2021

#JNUattack : विद्यार्थ्यांसोबत मंत्री जितेंद्र आव्हाड यांचाही ठिय्या

JNU कॅम्पसमध्ये JNUSU च्या पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा देशभरातून निषेध केला जातोय. मुंबईमध्येही या हल्ल्याचे पडसाद उमटले आहेत. मुंबईत रविवारी विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढून हल्ल्याचा निषेध केला. या ठिय्या आंदोलनात राज्याचे नवनिर्वाचित गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे देखील सहभागी झाले.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जितेंद्र आव्हाड स्वतः काही वेळ विद्यार्थ्यांसोबत ठिय्या मांडून बसले. आव्हाड यांनी JNUमधील हल्ल्याचा निषेध केला.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

मी या विद्यार्थ्यांना समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे.

सर्व विद्यार्थी शांततेने आंदोलन करत आहेत.

JNU मध्ये जो हिंसाचार झाला हे निषेधार्ह आहे.

JNU मधील विद्यार्थ्यांच्या हुशारीला सरकार घाबरतंय.

जेव्हा विद्यार्थी सरकार विरोधात उभे राहतात, तेव्हा ते सरकार जास्त वेळ चालत नाही.

विचारांचा मतभेद असू शकतो मात्र मनभेद असणं योग्य नाही

दिल्ली सरकारने लवकर कारवाई केली पाहिजे.

आपणही विद्यार्थी चळवळीतून पुढे आलो आहोत.

माणुसकी माझा धर्म आहे. तो पाळण्यासाठी आपण या आंदोलनात आलो आहोत, असं आव्हाड यावेळी म्हणाले.

विद्यार्थ्यांवरील हा हल्ला डाव्या संघटनांनीच केला असल्याच्या वृत्ताची आव्हाड यांनी खिल्ली उडवली. ‘या दरोडेखोराच्या उलट्या बोंबा आहेत’ असं आव्हाड म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *