Tue. Sep 28th, 2021

कप्तान मलिक यांची दादागिरी, कामगारांना मारहाण

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केली आहे. मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कुर्ल्यात मारहाणीचा प्रकार घडला आहे.

कुर्ल्यातील चुनाभट्टीत एका रस्त्याचे काम सुरु आहे. या ठिकाणी काही कामगार उपस्थित होते. यावेळेस कप्तान मलिक हे तेथे पोहचले.

यावेळी कप्तान मलिक यांनी कामगारांना वर्क ऑर्डर कुठं आहे, अशी विचारणा करत मारहाण करायला सुरुवात केली.

अचानक करण्यात आलेल्या मारहाणीमुळे उपस्थित कामगार देखील घाबरले.

दरम्यान व्हायरल होणार व्हिडियो हा महिन्याभरापूर्वीचा असल्याचं सांगण्यात येत आहे.

कप्तान मलिक हे प्रभाग क्रमांक 70 चे नगरसेवक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *