Sun. Aug 7th, 2022

‘या’ व्हिडिओमुळे नवाब मलिक वादात, मनसेचा हल्लाबोल

महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा एक व्हिडिओ वादात सापडलाय. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नक्की प्रकरण काय ?

राष्ट्रवादीच्या अनेक नेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाच्या घोषणा देताना या व्हिडिओत पाहायाला मिळत आहे.

या व्हिडिओमध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार, सुनिल तटकरे, जयंत पाटील, छगन भुजबळ आणि विद्या चव्हाण या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

या व्हिडिओमध्ये राष्ट्रवादीचे नेते हात उंचावून ‘शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत आहेत. मात्र नवाब मलिक शांतपणे उभे आहेत.

यामुळे आता यावरुन राजकारण तापण्याची चिन्ह आहेत.

यावरुन मनसेचे अमेय खोपकर यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले अमेय खोपकर ?

अमेय खोपकर यांनी याबद्दल ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पठाण काय किंवा नवाब काय..मुद्दाम असे वागतात की या अवलादी स्वत:ला उद्दाम वगैरे समजतात.

मुद्दा एवढाच आहे की या टाळक्यांना आम्ही कट्टर मनसैनिक एक छदामही महत्त्वही देत नाही.

एका नवाबाने घोषणा दिल्या नाहीत म्हणून आमचे महाराज लहान होत नाहीत. तसेच एका बेवारिसने बढाई मारली म्हणून आमचे भाईबंद दुरावत नाहीत, अशी प्रतिक्रिया अमेय खोपकर यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

दरम्यान या प्रकरणावरुन भाजपनेही आक्षेप नोंदवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.