Tue. Jun 28th, 2022

राज्यमंत्री छगन भुजबळांची भाजपवर टीका

  राज्यात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात नेहमीच संघर्घ पाहायला मिळतो. क्रूझवरील ड्रग्जप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान एनसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. यावर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी टीका केली आहे. ‘सध्या कोणावरही धाडी सुरू आहे. शाहरुख खान उद्या भाजपमध्ये गेल्यावर तिथे कोकेन नाही तर पीठीसाखर सापडले असे म्हणतील,’ अशी खोचक टीका राज्यमंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर केली आहे.

  ‘मुंद्रा बंदरावर तीस हजार ड्रग्ज सापडले त्याचे नावसुद्धा नाही. ते तर बंदर आहे. त्याची चौकशी नाही. पण शाहरुख खानच्या घरामध्ये घुसले. संपूर्ण बॉलिवूडला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. रोज नव्या कोणाच्या तरी घरी धाडी पडतात. अजित दादांच्या बहिणींच्या घरी धाडी पडतात. हे सर्व पाहिल्यानंतर वाईट वाटते की काय चालू आहे,’ अशी खंतही छगन भुजबळ यांनी व्यक्त केली  आहे.

  ओबीसी आरक्षण रद्द झाले तरीही आरक्षण पूर्ववत करण्यासाठी आम्ही प्रत्येक पातळ्यांवर लढत आहोत. विरोधक मात्र विरोधकाला विरोध करायचा म्हणून आंदोलने करत आहेत. मात्र त्यांच्या आंदोलनाचेदेखील आम्ही स्वागत करतो मात्र ओबीसी आरक्षणासाठी इथे जन जागरण करण्यापेक्षा ओबीसी समाजाला घटनात्मक आरक्षण मिळावे यासाठी दिल्ली सरकारसमोर जागरण घाला, असेही भुजबळ म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.