Thu. Sep 19th, 2019

‘संवेदनशील मुद्दयांवर तरी संवेदना बाळगा’, Troll करणाऱ्यांना पंकजा मुंडे यांचे खडे बोल

0Shares

‘कोल्हापूर सांगली मध्ये पुराची गंभीर परिस्थिती असतांना संवेदनशील मुद्यावर तरी संवेदना बाळगा’ असं भावनिक आवाहन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नेटकऱ्यांना केलंय. त्या परळीत माध्यमांशी बोलत होत्या. गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांचा जुना फोटो सोशल मीडियावर ट्रोल केला जातोय. यावर आज पंकजा मुंडेंनी नेटकऱ्याना चांगलच सुनावलं..

मी Troll गांभीर्याने घेतं नाही. पण महापुरासारख्या गंभीर स्थितीमध्ये विरोधकांकडून तीन वर्षांपूर्वी अधिवेशनाच्या चहा पानांच्या वेळीचा फोटो सोशल मीडियावर टाकून चांगल्या कामाला divert केलं जातंय.

तो फोटो जर नीट पाहिला तर त्यामध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर आहेत. ते आज हयातही नाहीत.

ट्रोल करणाऱ्या माणसाच्या बुध्दीची कीव येते. किती दुष्ट आणि भ्रष्ट आहेत.

टीका करायची म्हणून जुने फोटो लावून आजच्या विषयाशी संदर्भ देण्यात येतोय. तो चुकीचा आहे.

टीका टिपण्णी आत्ता अंगवळणी पडलीय. मात्र अशा गंभीर परिस्थितीमध्ये नेटकरी अपुऱ्या माहितीवर आरोप प्रत्यारोप करतात याचं दुःख होतं, अशी खंत त्यांनी बोलावून दाखवली.

बऱ्याच वेळा अशा गंभीर परिस्थिती मध्ये विरोधक सत्ताधारी एकत्रित येवून मदत करण्याचं काम करतात. पण काही जण ट्रोल करणारे जुने फोटो लावून बदनामी करत आहेत. दुष्काळातील सेल्फी बाबतीत तेच झाले. मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तरी संवेदना बाळगा असं त्या म्हणाल्या..

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *