Wed. Jun 19th, 2019

अधिवेशनात गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचं गैरव्यवहार प्रकरण गाजण्याची चिन्हं!

0Shares

मुंबई येथील ताडदेवच्या एम.पी.मिल कंपाऊंड SRA गैरव्यवहाराप्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लोकायुक्त न्यायमूर्ती एम.एल. ताहलीयानी यांच्या चौकशी अहवालात मेहता यांच्यावर ताशेरे ओढले आहे. विरोधकांनीही मोहता यांच्यावरून भाजपवर टीका सुरू केली आहे. यामुळे प्रकाश मेहता यांचं मंत्रीपद धोक्यात आलं आहे. यावर मुख्यमंत्री यांनी आगामी विधानसभेत हे प्रकरण मांडण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. आगामी अधिवेशनात ATR मांडणार असं त्यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्र्यांनी चौकशी आधीच मेहतांना क्लीन चिट दिली होती. फडणवीस मंत्रीमंडळातील इतर मंत्र्यांची अशीच निष्पक्षपाती चौकशी होणार का ? आणि दोषी आढळल्यानंतर आता तरी मुख्यमंत्री भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करायचे सोडून प्रकाश मेहतांचा राजीनामा घेणार का ? असा प्रश्न विरोधक विचारत आहेत.

एम. पी मिल SRA प्रकल्प मंजूर करून डेव्हलपर ए. डी. कार्पोरेशनला 500 कोटी रुपयांचा फायदा मिळवून देण्याचा प्रकाश मेहतांचा उद्देश होता, असा आरोप विरोधकांनी हा घोटाळा उघडकीस आणताना केला होता.

काय आहे प्रकरण?

ताडदेव एम.पी. मिल कंपाऊंडमध्ये SRA ला परवानगी देताना मुख्यमंत्र्यांना त्याची माहिती असल्याचा शेरा प्रकाश मेहता यांच्याकडून फाईलवर मारण्यात आला होता.

प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्र्यांना याची माहिती नसल्याचं समोर आलंय.

मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय लागू करण्याआधी स्थगिती दिली.

मात्र मेहता यांनी आपल्या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर केल्याचं अहवलात म्हटलं आहे.

विरोधकांनी मात्र यावरून आक्रमक होत मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

मंत्री प्रकाश मेहता यांच्या बाबतीत जी माहिती समोर आली त्यानुसार फडणवीस सरकारच गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना MP मिल कंपाउंड प्रकरणी पाठीशी घालत आहेत का? असा प्रश्न विरोधक विचारत आहेत. या संबंधी गुन्हा दाखल करण्याची मागणीही विरोधक करत आहेत.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: