Tue. Dec 7th, 2021

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचं शेतकऱ्यांबद्दल ‘असं’ वक्तव्य!

हॉटेलमध्ये कपबशी धुवावी लागली तरी चालेल पण शेती नको अशी सध्या शेतकऱ्यांची मानसिकता असल्याचं वक्तव्य कोणी विरोधी पक्षातील नेता नाही, तर खुद्द सरकार मधील उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे. सुभाष देसाई आज नाशिक मध्ये पोल्ट्री एक्स्पो या कार्यक्रमाला आले असताना बोलत होते.

अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज असल्याचेदेखील त्यांनी म्हटलंय.

तेलंगणा आणि ओरिसा राज्य सरकारचं विशेष कृषी धोरण शेतकऱ्यानं संदर्भात अवलंबत शेतकऱ्यांसाठी खास तरतूद केली आहे.

याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनंही शेतकऱ्यांना अधिक मदत देण्याची आवश्यकता असल्याचं देखील मत त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान विधानसभा कार्यकाळ पूर्ण करणार आहे ठरलेल्या वेळेतच विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होतील या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी खुलासा याआधीच केलाय अस देखील देसाई म्हणाले.

शिवसेना निवडणुकीला केव्हाही तयार आहे, असं सूचक वक्तव्यदेखील त्यांनी यावेळी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *