Mon. Jan 24th, 2022

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कारला ट्रकची धडक

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कारला बांबू भरलेल्या ट्रकने धडक दिली. सुदैवाने मुनगंटीवार यांच्यासह कारमधील सर्वजण सुरक्षित आहेत. बल्लारपूर येथील कार्यक्रम आटोपून पोंभुर्णा येथे जात असताना ही घटना घडली. यामध्ये गाडीची किरकोळ हानी झाली आहे. पुढील नियोजित कार्यक्रमासाठी ते रवाना झाले. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *