Fri. Sep 30th, 2022

पाच कोटींच्या सिंथेटीक ट्रॅकवर मंत्र्यांच्या गाड्या

पुणे : नियोजित क्रीडा विद्यापीठासाठी या संकुलाची पाहणी आणि आढावा बैठक घेण्यासाठी उपस्थित नेते आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांनी सर्व नियमांचे उल्लंघन करून बालेवाडी-म्हाळुंगे येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलातील रनिंग ट्रॅकवर वाहने नेली. याप्रकरणी धावपटू, क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. ‘रनिंग ट्रॅकवर कसे वावरावे याचे मूलभूत ज्ञान नसलेली ही मंडळी क्रीडा विद्यापीठ काय काढणार’ असा संताप धावपटूंकडून व्यक्त होत आहे. आंतरराष्ट्रीय सिंथेटिक रनिंग ट्रॅकवर शनिवारी वाहने नेल्याप्रकरणी क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय आणि क्रीडा संकुल प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.