मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राजकीय ठेंगा

महाराष्ट्रात कोरोना प्रसार वेगाने होत असतानाच नियमांची सर्रास खिल्ली उडवण्याचे प्रकार अजूनही सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राजकीय मंडळीच ठेंगा दाखवत असल्याचे वारंवार समोर येते आहे. व्हिडिओमध्ये ही दोन दृश्य सोमवारची आहेत. एकात मंत्री अब्दुल सत्तारांच्या मुलाचा वाढदिवस कसा नियम धाब्यावर बसवून साजरा झाला हे दिसत आहे. तर, दुसऱ्या दृश्यात खुद्द मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री हजर असलेल्या न्हावाशेवा पाणी योजना शुभारंभातही नियमभंग झालेला आहे. या दोन्ही ठिकाणी परस्परात अंतर ठेवण्याचे भान राज्यकर्त्यांना राहिलेले नाही.