Sat. May 25th, 2019

भाऊबीजेचा मुहूर्त साधत मीराने शेअर केला ‘झेन कपुर’चा पहिला फोटो

0Shares

अभिनेता शाहिद कपूर आणि मिरा राजपूत कपूर यांना नुकताच पुत्ररत्न प्राप्त झाला, शाहीद-मीराच्या घरी सप्टेंबरमध्ये या गोंडस बाळाचे आगमन झाले. त्यानंतर शाहीद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत यांनी पहिल्यांदा त्यांच्या 2 महिन्यांचा बाळाचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

मीराने तिच्या इन्स्टाग्रामवर चिमुकल्या झेन कपूरचा फोटो शेअर केला आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी आणि त्याच्या चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र झेनच्या जन्मापासून त्याचा एकही फोटो या दोघांनीही सोशल मीडियावर शेअर केला नव्हता.

पण आता भाऊबीजेचा मुहूर्त साधत मीराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जगाला ‘हॅलो’ म्हणणाऱ्या चिमुकल्या झेनचा फोटो चाहत्यांसाठी अपलोड केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *