Thu. Jan 27th, 2022

मीरा रोडमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण; देहव्यापारासाठी केले अपहरण

मुंबईतील मीरा रोड येथे एका अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने अपहरण करत राजस्थानच्या टोक जिल्ह्यात देहव्यापारासाठी पाठवले असल्याचे उघडकीस आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे राजस्थानमधील टोक जिल्ह्यात मुजरा करण्याची प्रथा असून यासाठी अल्पवयीन मुलींचा देहव्यापारासाठी केला जातो. त्यामुळे या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नेमकं काय घडलं ?

चॉकलेट देण्याच्या बाहण्याने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करत राजस्थानमध्ये देहव्यापारासाठी पाठवण्यात आले.

राजस्थानमधील टोक जिल्ह्यात अजूनही मुजरा करण्याची प्रथा सुरू असून त्यासाठी मुलीचे अपहरण केल्याचे समजते आहे.

मुंबईसह अनेक ठिकाणाहून अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांना देहव्यापारासाठी विकले जाते.

या प्रकरणात पोलिसांनी चार महिलांना अटक केली आहे.

पोलिसांनी राजस्थानला जाऊन मुलीची सुटका केली असून मुलीला तिच्या भावाकडे सोपविण्यात आले आहे.

चार महिलांना 14 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *