Thu. May 19th, 2022

‘मविआत कोरोना नियमांबाबत असमन्वय’ – देवेंद्र फडणवीस

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली असून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये कोरोना नियमावलीबाबत असमन्वयता असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच मविआ सरकारचे सर्व नेते नियम घोषित करत असातात तर कोरोना नियमावली घोषित करण्याआधी एकवाक्यता हवी, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिली आहे.

पंजाबमधील आंदोलक हे काँग्रेसचे कार्यकर्ते

देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत घडलेल्या घटनेवर भाष्य केले आहे. पंजाबमधील आंदोलक हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पंतप्रधानांच्या पाठीशी भाजपा उभी असून पंतप्रधानांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. तर पंतप्रधानांविरोधात षडयंत्र रचणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असे फडणवीस म्हणाले. पंतप्रधानांवरील हल्ला म्हणजे देशावरील हल्ला. काँग्रेस नेते बेशरमपणे पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत बोलत आहेत त्यामुळे काँग्रेस नेत्यांची वक्तव्य ही निर्लज्जपणाचा कळस असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.