Wed. Jun 29th, 2022

अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार

अमरावतीत अल्पवयीन अद्यापही सुरक्षित नसल्याचं, पुन्हा एकदा पुढे आल आहे.एका अल्पवयीन मुलीला चक्क पेढ्यातून गुंगीच औषध देऊन, तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडिता तिच्या मामाच्या गावाला असताना आरोपीने तिला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर १२ जूनच्या रात्रीला तिला चारचाकीमध्ये बसवून गुंगीच औषध देत तिचे लचके तोडले आहे. भेदरलेल्या परिस्थितीमध्ये परतवाडा पोलिसात पोहोचली तिने सांगितलेल्या आदेशानुसार पोलिसांनी दोन आरोपीविरुद्ध अपहरण, सामूहिक अत्याचार आणि पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल करून दोन नराधमांना अटक केली आहे. या संदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत.

गेल्या वर्षी पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीमध्ये अमरावतीच्या ग्रामीण भागात सन २०२०-२०२१ मध्ये १९ अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. तर ७४ विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद पोलिसात दाखल आहे. चालू वर्षाचा महिना लोटताच पुन्हा एकदा अत्याचाराच्या घटना पुढे येत असल्याने अमरावतीत अल्पवयीन मुली असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा समोर आल आहे. अमरावती जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला असून महिला राज अमरावती मध्ये असताना महिला कितपत सुरक्षित आहेत याकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. अमरावतीत अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने याला आळा घालण्यासाठी प्रशासनाने “ॲक्शन प्लॅन” आखणं गरजेचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.