Mon. Aug 19th, 2019

Whatsapp मुळे सापडली हरवलेली मुलगी

0Shares

सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकारे केला तर ते खरंच वरदान ठरू शकतं, हे एका ताज्या उदाहरणावरुन समोर आलं आहे. एक हरवलेली दहा वर्षांची मुलगी Whatsapp ग्रुपमुळे सुखरूप घरी पोहोचली आहे.

काय घडलं नेमकं?

पिंपरी-चिंचवड शहरातील 10 वर्षीय मुलगी राहत्या घरातून न सांगता परिसरातील एका मंदिराकडे गेली होती.

मात्र, घरी परतण्याचा रस्ताच ती विसरल्याने हरवली होती.

कार्तिकी खोडके असं या 10 वर्षीय हरवलेल्या मुलीचं नाव आहे.

ही मुलगी रस्ता चुकल्याने घरापासून दोन ते अडीच किलोमीटर लांब गेली होती.

मुलगी बेपत्ता झाल्याचं लक्षात येताच तिच्या आई-वडिलांनी तिचा सर्वत्र शोध घेतला.

मात्र ती सापडली नाही.

अखेर भोसरी पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी संबंधित घटनेची माहिती दिली.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर भोसरी पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेत मुलीला शोधण्याची मोहिम सुरू केली.

पोलिसांनीच मुलीचा फोटो आणि मोबाईल क्रमांक स्थानिक व्हाट्सअॅपवरील ग्रुपमधून व्हायरल केला.

दरम्यान, एका सजग नागरिकाने कार्तिकीच्या वडिलांना आणि भोसरी पोलिसांना फोन करून मुलगी दिघी रोड येथे असल्याचं सांगितलं.

त्यानंतर तातडीने भोसरी पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता कार्तिकी घाबरलेल्या अवस्थेत रडत बसलेली त्यांना आढळली. तब्बल सात तासानंतर आपली मुलगी सुखरूप असल्याचे पाहून आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *