Sun. Aug 25th, 2019

अमेय खोपकर यांच्यासमोर अभिनेता अक्षयकुमारची माघार

0Shares

अभिनेता अक्षयकुमार याने 15 ऑगस्टला प्रदर्शित होणारा ‘मिशन मंगल’ हा Bollywood चा सिनेमा डब करून मराठीत प्रदर्शित करण्याची घोषणा शुक्रवारी केली होती. मात्र, ‘महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेने’चे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुक लाईव्हमधून त्याला विरोध करताच दोन तासांत अक्षय कुमारने माघार घेतल्याचं जाहीर केलं.

काय म्हणणं आहे अमेय खोपकर यांचं?

मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळवण्यासाठी आतापर्यंत आंदोलन करत आलो.

आता तुकडा पाडण्याची वेळ आली आहे.

15 ऑगस्टला अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ हा सिनेमा जगामध्ये हिंदीत प्रदर्शित होतोय.

महाराष्ट्रात हिंदीसह मराठीतही प्रदर्शित होणार आहे.

हिंदी भाषेतील ‘मिशन मंगल’ला आमचा विरोध नाही, पण मराठीत डब करण्यामागं फार मोठं षडयंत्र आहे.

इतर भाषेतील सिनेमे मराठीत डब करणार असाल, तर मराठी सिनेमांनी करायचं काय? असा प्रश्न अमेय खोपकर यांनी उपस्थित केला. इतर भाषेतील चित्रपट मराठीत डब करण्याविरोधात येत्या काही दिवसांत मनचिकसे मोठं आंदोलन उभं करेल.

सरकारनं यावर योग्य ती कारवाई केली नाही, तर चित्रपटगृहांच्या काचा फुटतील.

चित्रपटगृहांच्या मालकांनाही ते परवडणार नाही.

‘मिशन मंगल’ हा चित्रपट मराठीत डब करण्यापेक्षा कलाकारांसोबत रिशूट करा.

त्याला आमचा विरोध नाही. आमचा केवळ मराठीत डब करून रिलीज करायला विरोध आहे. जर ‘मिशन मंगल’ मराठीत डब करून हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित केला, तर हिंदी चित्रपटही रिलीज होऊ देणार नाही, असं खोपकर यांनी फेसबुक लाइव्हद्वारे स्पष्ट केले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *