Sat. Oct 1st, 2022

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली आहे.

 

महिला वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅचमध्ये अर्धशतक झळकावणारी मिताली राज महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे.

 

आपल्या 183व्या सामन्यात मितालीने ही कामगिरी बजावली असून तिने इंग्लंडची माजी खेळाडू चार्ल्स एडवर्डसच्या विक्रमाला मागे टाकलं आहे.

 

एडवर्ड्सने 191 वनडे सामन्यांमध्ये 5 हजार 992 धावा ठोकल्या होत्या. ही धावसंख्या गाठण्यासाठी एडवर्ड्सला 180 डाव खेळावे लागले होते, मात्र मितालीने केवळ

164 डावातच ही मजल मारली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.