Sun. Jun 20th, 2021

मिताली राजची टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

मिताली राजने 32 टी-20 आंतरराष्ट्रीय सामान्यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्त्व केले आहे.

भारतीय संघाची कर्णधार मिताली राज हीने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार हे जाहीर केले आहे. मिताली राज आता आपले लक्ष फक्त विश्वचषकाकडे केंद्रीत करणार आहे. मिताली राजने 32 टी-20 आंतरराष्ट्रीय सामान्यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्त्व केले आहे.

मिताली राजच्या नेतृत्त्वात असलेला भारतीय संघ मात्र विश्वचषक जिंकण्यास अयशस्वी ठरला आहे. मिताली राजने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या आधी टी- 20 आंतरारष्ट्रीय किक्रेटमध्ये 2,000 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

टी- 20 आतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2,000 धावा करणारी  मिताली राज ही भारतीय महिला संघाची पहिली फंलदाज ठरली होती.मिताली राजने भारताकडुन 88 टी-20 सामन्याचे नेतृत्त्व केले आहे. टी-20 च्या करिअरमध्ये 37.52 च्या सरासरीने तिने 2364  अशा धावा केल्या आहेत.  या मध्ये 17 अर्धशतकांचा समावेश होता.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *